दोन मते दिली तरच मतदान प्रक्रिया पूर्ण..
⚡कुडाळ ता.०४-: तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–2026 करीता शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
सदर निवडणुकीसाठी कुडाळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एकच बॅलेट युनिट (Ballot Unit) वापरण्यात येणार आहे. मतदारांनी या एकाच बॅलेट युनिटवर दोन मते नोंदवायची आहेत. एक मत जिल्हा परिषदसाठी व एक मत पंचायत समिती साठी नोंदवल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
मतदारांनी मतदान करताना बॅलेट युनिटवरील चिन्हे व पर्याय काळजीपूर्वक पाहून आपले जिल्हा परिषदेकरिता एक व पंचायत समिती साठी एक असे मतदान करावे.
तसेच कोणताही गोंधळ टाळण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. ऐश्वर्या काळुशे व तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
