Headlines

कुडाळ पोलिसांकडून ‘एक राखी सुरक्षेची’…

सुरक्षित प्रवासाचे नागरिकांना आवाहान:हातात सुरक्षा धागा बांधून पोलिसांनी जपली बांधिलकी.. ⚡कुडाळ ता.२८-: “राखीच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी” हा संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आज रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून कुडाळ पोलिसांनी शहरात ‘एक राखी सुरक्षेची’ अभियान राबविले. रस्ता सुरक्षेचे नियम पाळून वाहन चालवा असा संदेश या अभियानातून वाहनचालकांना देण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर…

Read More

श्री पंचम खेमराज महाविद्यालय मध्ये पाच दिवसीय अध्यापक क्षमता विकास कार्यक्रमाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री पंचम खेमराज महाविद्यालय ( स्वायत्त ) यामध्ये पाच दिवसीय अध्यापक क्षमता विकास कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता विकास कक्ष तसेच रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व भूगोल या विभागांच्या वतीने व मुंबई येथील वेस्टर्न रिजनल इन्स्ट्रुमेंटेशन सेंटर यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात…

Read More

मदर क्वीन्‍स इंग्लिश स्कूलमध्ये चिमुकल्यांचा रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.२८-: सिं. जि. शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्‍स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या पुर्व प्राथमिक विभागात शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनिअर केजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुंदर पारंपरिक वेशभूषा परिधान करून रक्षाबंधन सोहळ्यात आवडीने सहभाग घेतला. औक्षण करून विद्यार्थ्यांनी एकमेकांना राख्या बांधत मिठाईचे वाटप केले….

Read More

गणेशोत्सवासाठी कुडाळ नगरपंचायत सज्ज…

वाहतूक व विसर्जन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन:अवजड वाहनांना प्रवेशबंदी ; पर्यायी मार्गाने डंपर वाहतूक.. ⚡कुडाळ ता.२८-: गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, गणेश विसर्जन, आरोग्य सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी कुडाळ नगरपंचायतीने व्यापक नियोजन केले आहे. नगराध्यक्ष प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या समन्वय बैठकीत विविध विभागांच्या सहकार्याने गणेशोत्सव कालावधीतील उपाययोजनांबाबत महत्त्वाचे…

Read More

कुडाळमध्ये १ सप्टेंबरला रंगणार रानभाज्यांचा महोत्सव..

प.स. तर्फे रानभाजी प्रदर्शन व पाककृती स्पर्धेचे आयोजन:विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे.. ⚡कुडाळ ता.२८-: कोकणातील पारंपरिक रानभाज्यांचे संवर्धन, प्रचार-प्रसार तसेच त्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे रानभाजी प्रदर्शन, पाककृती स्पर्धा व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार निलेश…

Read More

राखीच्या धाग्यातून जुळले आपुलकीचे ऋणानुबंध…

युवा नेते विशाल परब यांच्याकडून भगिनींसाठी स्नेहमय रक्षाबंधन सोहळा:माजगाव नाका येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात भावनिक कौटुंबिक वातावरण.. ⚡सावंतवाडी,ता. २८-: रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखीच्या धाग्यातून भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा प्रत्यय सावंतवाडीत आला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील भगिनींशी असलेला स्नेह आणि विश्वासाचा ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी भाजपचे राज्य युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वतीने माजगाव नाका…

Read More

उभादांडा जि. प. सदस्य संजय गावडे यांच्यामार्फत मोचेमाड येथे शैक्षणिक साहित्य वाटप

वेंगुर्लाजि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मोचेमाड येथे सन 2025-26 या वर्षातील शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध विषयात नैपुण्य मिळवले, त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात जि. प. सदस्य संजय गावडे यांनी विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी त्याच बरोबर मराठी शाळांमध्ये विध्यार्थ्यांना ओढ निर्माण होऊन मराठी शाळा टिकण्यासाठी सात्यत्याने प्रयत्न करणार असे प्रतिपादन करुन…

Read More

सावंतवाडी पोलीस निरीक्षक मगदूम यांचे महिला शिवसेनेतर्फे स्वागत…

रक्षाबंधनानिमित्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या.. ⚡सावंतवाडी, ता. २८ -: सावंतवाडी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री. मगदूम यांचे सावंतवाडी शहर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच रक्षाबंधनाच्या सणानिमित्त पोलीस निरीक्षक मगदूम यांच्यासह पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना महिला पदाधिकाऱ्यांनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी पोलीस आणि समाज…

Read More

शहरातील खड्डेमय रस्ते, तुंबलेल्या गटारांवरून शिवसेना आक्रमक..

गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्ती व गटारे साफ करा: नगरपरिषदेकडे मागणी, भारती मोरे यांनी निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.२८-: शहरातील विविध भागांतील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि गटारांच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गणेशोत्सवापूर्वी आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत महिलाशर अध्यक्ष भारती मोरे यांनी निवेदन केले सादर. शहरातील…

Read More

सावंतवाडीत रविवारी राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकरचे विदयार्थ्यांसाठी बुद्धिबळ मार्गदर्शन शिबीर…

⚡सावंतवाडी ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय रेटेड बुद्धिबळ खेळाडू आणि राज्य पंच बाळकृष्ण पेडणेकर याचे विदयार्थ्यांसाठी विशेष बुद्धिबळ मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रविवार दि.३० ऑगस्ट रोजी सकाळी ०९:३० वाजता सावंतवाडी येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात शिबीर घेण्यात येईल. पुढील कालावधीत होणा-या विदयार्थ्यांच्या तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ निवड…

Read More
You cannot copy content of this page