बांदा-तुळसाण पुलानजीक ओंकार हत्तीचा हल्ला; गाभण म्हशी ठार…

⚡बांदा ता.१४-: बांदा परिसरात गेले काही दिवस स्थिरावलेल्या ओंकार हत्तीने वाफोली आईरवाडी येथील मंगेश उत्तम आईर यांच्या मालकीच्या गाभण म्हशीवर बांदा तुळसाण पुलानजीक नारळ फोफळीच्या बागेत हल्ला करत तिला ठार केली. यामध्ये आईर यांचे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे.ओंकार हत्ती गेले काही दिवस या भागात स्थिरावला आहे. बांदा, इन्सुली,…

Read More

घारपी शाळेत बालदिन विविध उपक्रमांनी बनला आनंददीन…

⚡बांदा ता.१४-: घारपी येथील जिल्हा परिषद शाळेत बालदिन मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्यासाठी हा दिवस आनंददायी ठरला. या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा उपक्रमांमधून चाचा नेहरूंना आदरांजली अर्पण केली.कार्यक्रमाची सुरुवात नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि पुष्पार्पण…

Read More

मडुरा येथील नाबर स्कूलमध्ये उत्साहात बालदिन साजरा…

बांदा/प्रतिनिधीमडुरा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे बालदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पं. जवाहर लाल नेहरू यांच्या प्रतिमा पुजानाने झाली.यावेळी स्थानिक समिती सदस्य सुरेश गावडे, शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियांका परब, पालक परेश सावंत, मुख्याध्यापिका निती साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी…

Read More

डॉ. आंबेडकर नगर येथील लोंबकळणारे फ्यूज बॉक्सबंद…

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पाठपुरावा.. ⚡कुडाळ ता.१४-: शहरातील डॉ. आंबेडकर नगर पुतळा नजीकच्या पोलवरील लोम्बकळणाऱ्या धोकादायक फ्यूजना महावितरण कडून बॉक्स बसविण्यात आला आहे. नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना पदाधिकारी आणि नागरिकांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन याकडे लक्ष वेधले होते.मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कुडाळ शहरातील नागरिक आणि शिवसेना,…

Read More

७२ व्या अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचा उद्घाटन समारंभ संपन्न…

⚡ओरोस ता.१४-: दरवर्षी देशभरात दिनांक १४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सहकार सप्ताह साजरा केला जातो. सहकारातील सर्वात मोठा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते. या सप्ताहाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ मर्या., सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने हा सप्ताह पूर्ण जिल्हाभरात साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा…

Read More

आमदार राणे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटाचे नरेश हुले यांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡मालवण ता.१४-:आमदार निलेश राणे यांनी मालवणात पुन्हा एकदा उबाठा गटाला धक्का दिला. मालवण नगरपरिषद प्रभाग सात येथील उबाठा गटाचे नरेश हुले, फारूक मुकादम यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुका संपर्कप्रमुख राजेश…

Read More

सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल…

⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी भाजपकडून सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज दुपारी निवडणूक कक्षामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे त्यांनी आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केल. यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेम सावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, डॉ….

Read More

बिहारच्या विजयाने सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांना बळ…

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत:तर येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत विरोधी पक्षांना एक टक्काही फायदा होणार नाही.. ओरोस ता १४बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षाने जोरदार यश मिळविल्याने जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. कार्यकर्त्यांत उत्साह वाढला आहे. भाजप शतप्रतिशत होतानाच राष्ट्र, राज्य विकसित करण्याच्या संकल्पाला ताकद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे जिल्हाध्यक्ष…

Read More

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी दुकान बंद करावं तसं बिहारमध्ये काँग्रेसने ‘दुकान बंद करावं’ …

खासदार नारायण राणे:बिहार निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजयावर दिली प्रतिक्रिया.. ⚡कणकवली ता.१४-: बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीएला मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे प्रथमतः अभिनंदन. दोघांनीही सांगितल्याप्रमाणे मोठा विश्वास दाखवत त्यांना प्रचंड बहुमत दिले आहे. या विजयावर प्रतिक्रिया देताना रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी माध्यमांशी…

Read More

स्मार्ट मिटर संदर्भात मनसे आक्रमक…

स्मार्ट मीटर बसवण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांसोबत विपरीत घटना घडल्यास महावितरणचे अधिकारी जबाबदार:मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांचा इशारा.. ⚡सावंतवाडी ता.१४-: स्मार्ट मीटर संदर्भात मनसे आक्रमक झाली असून महावितरणचे अधिकारी नागरिकांना संभ्रमात ठेवत आहेत. जुने मीटर खराब झाले की त्याऐवजी स्मार्ट मीटरच बसवण्याची जबरदस्ती करत आहेत. ग्राहकांच्या घरी सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांसोबत कोणतीही विपरीत घटना घडल्यास…

Read More
You cannot copy content of this page