Headlines

सिंधुदुर्ग महाविद्यालयातील नारळ लढविणे स्पर्धेत भूमी मसुरकर व भावेश परब विजयी…

⚡मालवण ता.२९-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या जिमखाना व सांस्कृतिक विभागामार्फत नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेत मुलींमधून टीवायबीए ची भूमी मसुरकर हिने प्रथम तर कनिष्ठ महाविद्यालयाची मानसी धुरत हिने द्वितीय क्रमांक पटकविला. मुलांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचा भावेश परब याने प्रथम तर टीवायबीकॉम च्या श्रीराज परब याने द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य…

Read More

वेंगुर्ल्यात ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा…

⚡वेंगुर्ला ता.२९-: ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय जनता पक्षाच्या वेंगुर्ला येथील कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश रेगे यांना पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील योगदान, अनुभव आणि…

Read More

तळवडे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इको-फ्रेंडली राखी उपक्रम; चिमुकल्यांचे झाडांना राखी बांधून वृक्ष रक्षणाचा संदेश…

⚡सावंतवाडी ता.२९-: रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून येथील इंग्लिश मिडियम स्कूल तळवडे मध्ये इको-फ्रेंडली राखी मेकिंग ऍक्टिव्हिटी उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी प्लास्टिकला फाटा देत पानं, फुलं, बिया, कापूस यांसारख्या नैसर्गिक साहित्यापासून आकर्षक राख्या बनवल्या. या बियांच्या राख्या नंतर मातीत लावल्यास त्यापासून नवीन रोप उगवणार आहे. उपक्रमाची सांगता अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने झाली. शाळेच्या प्री-प्रायमरी आणि प्रायमरी विभागातील…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर अण्णा केसरकर आक्रमक…

⚡सावंतवाडी, ता.२९-: येथील उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिट आणि वीस डॉक्टर प्रत्यक्ष कुठे आहेत ते दाखवा, अशी मागणी स्वातंत्र्य सैनिक अण्णा केसरकर यांनी आज वैद्यकीय अधिक्षक डॉ।विशाल रेड्डी यांच्याकडे केली. आरोग्य प्रश्नी प्रसंगी आंदोलन करावे लागेल असा इशारा श्री.केसरकर यांनी दिला.यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी निःशब्द झाले. सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात कित्येक वेळ पेशंट…

Read More

विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या हातभार कौतुकास्पद….

नागेश मोरये :प्राण जीवन सहयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने वह्या वाटप ; नांदगाव पंचक्रोशीत ५ हजार वह्या वाटपाचा टप्पा पूर्ण.. ⚡कणकवली ता.२९-:नांदगाव पंचक्रोशीतील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांमध्ये सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर व पत्रकार भगवान लोके यांनी घेतलेला वह्या वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. नेहमीच सरस्वती हायस्कुल नांदगावमध्ये शैक्षणिकदृष्ट्या आम्ही विविध उपक्रम राबवत असतो, त्याला…

Read More

वेंगुर्ला येथे६ सप्टेंबरलाविशाल परब पुरस्कृत”उत्सव रानभाज्यांचा”…

⚡वेंगुर्ला ता.२९-: माझा वेंगुर्ला, इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि हिरकणी महिला शहरस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल परब पुरस्कृत ‘उत्सव रानभाज्यांचा’ २०२६ अंतर्गत ‘रानभाजी पाककला स्पर्धा व प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. निसर्ग आणि माणूस यांच्यातील पुरातन नाते अधिक दृढ करण्यासोबतच पारंपरिक रानभाज्यांची चव, त्यांचे महत्त्व आणि आरोग्यदायी गुणधर्म लोकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश…

Read More

वागदे येथे स्थानिक बियाणे बँकेचा आज शुभारंभ

‘सिंधुजीविका’ प्रकल्पांतर्गत मुक्ताई शेती संशोधन व विकास गटाचा उपक्रम कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपजीविका व पोषण सुरक्षेसाठी पीक विविधता, गौण वनौपज, जंगली व औषधी वनस्पतींचे लोकसहभागातून संवर्धन व व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने ‘सिंधुजीविका’ प्रकल्पांतर्गत स्थानिक बियाणे बँकेची सुरुवात करण्यात येणार आहे. मुक्ताई शेती संशोधन व विकास गटाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्थानिक पिकांच्या विविध…

Read More

घोषवाक्य स्पर्धेचे ३१ ऑगस्टला बक्षीस वितरण

बॅ नाथ पै कॉलेज एमआयडीसी येथे आयोजन कुडाळ : दत्ताविष्कार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग आरंभ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आस्था फाऊंडेशन, कुडाळ, (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेचाबक्षिस वितरण समारंभ सोमवार ३१ ऑगस्ट रोजी  दुपारी ३ वाजता बॅ. नाथ पै कॉलेज एम आय डी सी कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्ञान, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव यांना प्रोत्साहन…

Read More

रक्षाबंधन, पोलीस बांधवांपासून विशेष मुलांपर्यंत…!

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपली माणुसकीची वीण कुडाळ : भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक हस्तनिर्मित राख्या बांधून समाजसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.या उपक्रमांतर्गत प्रशालेतील स्काऊट आणि गाईड विद्यार्थ्यांनी…

Read More

देवा भाऊ, आमचे स्त्रीधन सुरक्षित करा !

मच्छीमार भगिनींकडून मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदेंना प्रतीकात्मक रक्षाबंधन कुडाळ : मालवण येथील सोने तारण अफरातफर प्रकरणातील पीडित मच्छीमार महिलांनी रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतीकात्मक रक्षाबंधन करून आपल्या स्त्रीधनाची सुरक्षितता आणि न्यायासाठी साकडे घातले.एका वित्तीय संस्थेतील सोने तारण गैरव्यवहारप्रकरणी मच्छीमार भगिनींच्या वतीने मालवण पोलीस ठाण्यात सामूहिक तक्रार दाखल करण्यात आली…

Read More
You cannot copy content of this page