श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात २२ व २३ जानेवारीला माघी गणेश जयंती सोहळा…

⚡बांदा ता.१६-: बांदा येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात गुरुवार दिनांक २२ व शुक्रवार दिनांक २३ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
गुरुवारी पहाटे ५ वाजता काकड आरती, अभिषेक व पुजा, सकाळी ९ वाजता श्री गणेश पूजा, श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी १ वाजता महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम, तर सायंकाळी ७ वाजता सायं आरती होईल. रात्रौ ८ वाजता बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ कोळंब, मालवण यांचा ‘कर्मणो गहणा गती, धर्म निष्ठ राजा सोमकांत’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
तसेच शुक्रवार दिनांक २३ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता कार्यक्रमाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन संपन्न होणार आहे. सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध जादूगार केतनकुमार यांचा मॅजिक शो होणार आहे. रात्रौ ८ वाजता निवेदक शुभम धुरी यांच्यासोबत खेळ संगीत पैठणीचा हा खेळ खास महिलांसाठी रंगणार आहे. यामध्ये पहिल्या सहभागी होणाऱ्या ६० महिलांना साडी भेट देण्यात येणार आहे.
भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री पिंपळेश्वर गणपती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो:-
बांदा पिंपळेश्वर गणपती.

You cannot copy content of this page