मुख्य बाजारपेठेतील रस्ता रखडला; नगरसेवक देव्या सूर्याजी आक्रमक…

पाईपलाईन कामानंतर १० दिवस उलटूनही डांबरीकरण नाही; आजच काम न झाल्यास नगरपरिषदेच्या दारात माती-खडी टाकून आंदोलनाचा इशारा..

⚡सावंतवाडी ता.१६-: मुख्य बाजारपेठेत पाईपलाईनच काम पुर्ण होऊन १० दिवस झाले तरी रस्ता डांबरीकरण काम पुर्णत्वास आलेलं नसल्याने नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. न.प. बांधकाम विभागाचे अधिकारी टेंडर प्रोसेसच्या कामात व्यस्त असल्याने त्यांना जनसामान्यांच्या प्रश्नांच काही पडलेलं नाही. आजच्या दिवसात डांबरीकरण झाले नाही तर माती अन् खडी नगरपरिषदेच्या दारात आणून ओतू असा इशारा देखील श्री. सुर्यांजींनी यावेळी दिला.

ते म्हणाले, नागरिकांना गढूळ पाणी येत असल्याने पाण्याची नवी लाईन बाजारपेठ टाकली होती. मात्र, काम पूर्णत्वास येऊन १० दिवस झाले तरी रस्ता दुरूस्तीच काम अद्याप झालेल नाही. रस्ता खणल्यानंतर तात्काळ दुरूस्ती केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितले होत. मात्र, नगरपरिषद बांधकाम विभागाचे अधिकारी मस्तावले आहेत. लक्ष वेधूनही त्यांचं लक्ष नाही. भर बाजारपेठेतील दुरावस्था त्यांना दिसत नाही. मुख्य बाजारपेठेत तात्काळ डांबरीकरण करण अपेक्षित असताना अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे येथील व्यापारी व नागरिकांना धूळीचा त्रास सहन करावा लागत आहे. व्यापारी वर्गाचा माल खराब होत आहे. न.प.चे बांधकाम अधिकारी टेंडर प्रोसेसच्या कामात व्यस्त आहेत. त्यांना सामान्यांच्या प्रश्नाच पडलेलं नाही. त्यामुळे जर व्यापारी वर्गाच नुकसान झालं, नादुरुस्त रस्त्यामुळे अपघात झाला तर त्याला सर्वस्वी न.प.बांधकाम विभाग जबाबदार राहील. तसेच आजच्या दिवसात मुख्य बाजारपेठीतल रस्त्याच काम न झाल्यास येथील माती आणि दगड नगरपरिषदेच्या दारात टाकून आंदोलन करू असा इशारा नगरसेवक श्री. सुर्याजींना दिला. यावेळी बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने होणाऱ्या त्रासासह झालेल्या नुकसानीची व्यथा त्यांच्यासमोर मांडली.

You cannot copy content of this page