Headlines

दांडी शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री वाटप…

⚡मालवण ता.१०-:
मालवण दांडी येथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेत सामाजिक कार्यकर्ते विश्वास मोंडकर यांच्या तर्फे त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास विश्वास मोंडकर, नगरसेविका अन्वेषा आचरेकर, नगरसेवक महेश कोयंडे, नगरसेवक तपस्वी मयेकर, मुख्याध्यापिका विशाखा चव्हाण, दिनकर शेलटकर, किशोर मोंडकर, प्रणिता रेवंडकर, शिक्षिका श्रद्धा बागवे, अमृता राणे, उज्ज्वला चौकेकर, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका सौ. चव्हाण यांनी उपास्थित मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी मार्गदर्शन करताना विश्वास मोंडकर यांनी आज अनेक मराठी शाळा बंद पडत असून मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवून विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

यावेळी नगरसेवक महेश कोयंडे यांनी दांडी शाळेला भेडसावणाऱ्या समस्या तसेच पालकांना शाळे संबधी मदत लागल्यास सहकार्यासाठी आपण तत्पर आहोत, असे सांगितले. तर नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनीही मराठी शाळेचे महत्व पटवून देत दांडी शाळेसाठी आपले नेहमीच सहकार्य लाभेल, असे सांगितले. नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. किशोर मोंडकर यांनीही मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका सौ. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना छत्री वाटप केल्याबद्दल मोंडकर यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page