Headlines

नरडवे रोडवरील नगरपंचायतीच्या आरक्षित जागेतील स्टॉलवर कारवाई…

मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेसीबीच्या साहाय्याने हटाव मोहीम; स्टॉलधारकांची धावपळ..

⚡कणकवली ता.१०-: शहरातील नरडवे रोडवरील नगरपंचायतीच्या आरक्षित व नुकत्याच ताब्यात आलेल्या जागेतील स्टॉल हटाव मोहिमेला शुक्रवारी सायंकाळी अचानक सुरुवात करण्यात आली. मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमुळे स्टॉलधारकांची मोठी धावपळ उडाली.

कणकवली शहरातील नरडवे रोडवरील नगरपंचायतीच्या आरक्षित जागेवर उभारण्यात आलेले स्टॉल हटविण्याची कारवाई शुक्रवारी सायंकाळी हाती घेण्यात आली. या जागेतील स्टॉलधारकांना यापूर्वीच नगरपंचायतीकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही काळ कारवाई न झाल्याने स्टॉलधारक निर्धास्त होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली अचानक कारवाई सुरू करण्यात आली.

दोन जेसीबीच्या साहाय्याने उपजिल्हा रुग्णालयासमोरील परिसरापासून नरडवे नाका येथील भागापर्यंत उभारण्यात आलेले स्टॉल हटविण्यात आले. या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या स्टॉलधारकांना आपले साहित्य तातडीने हलवावे लागले. त्यामुळे परिसरात काही काळ धावपळीचे वातावरण निर्माण झाले.

नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले होते. कारवाईनंतर नगरपंचायतीच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमण हटल्याने परिसर मोकळा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

You cannot copy content of this page