Headlines

कोकणातील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास इच्छूक…

विल्सन केपरॉप :आंतराष्ट्रीय धावपटू विल्सन केपरॉप धावणार कुडाळ मॉन्सून मॅरेथॉन ,मॉन्सून स्पर्धेच्या टी-शर्टचे अनावरण..

⚡कुडाळ ता.१०-: सुमारे तीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केपरॉप येत्या १२ जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉन मध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केपरॉप कुडाळ मध्ये दाखल झाला असून आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. येथे एखादी अकादमी स्थापन झाली तर कोकणातल्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. धावणं हि केनियामध्ये संस्कृती आहे, तशी संस्कृती अशा मॅरेथॉन मधून कोकणात देखील तयार होईल असं ते म्हणाले. आपण जगभरात विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो आहे, पण या हाफ मॅरेथॉनचा जो मार्ग आहे तो चढ उतार, वळणावळणाचा आहे, सोबत छान निसर्ग आहे पण तेवढीच आर्द्रता असल्याने इथं धावणं हे आव्हानात्मक असेल. मी अशा वातावरणात कधीच धावलो नाही. त्यामुळे कुडाळ मॅरेथॉन मध्ये मी देखील धावणार असल्याचे त्यांनी सांगितले. राणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि टीम केएमआर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या हाफ मॅरेथॉन मध्ये सुमारे २ हजार जणांनी नोंदणी केल्याचे यावेळी आयोजक अजित राणे यांनी सांगितल. यावेळी मॉन्सून स्पर्धेच्या टी-शर्टचे अनावरण देखील करण्यात आले.
येथील राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या मार्फत येत्या १२ जुलैला कुडाळ मॉन्सून रन २०२६ च आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचं या मॉन्सून रनच हे तिसरं वर्ष आहे. या मॉन्सून रनचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून केनियाचा महान आंतरराष्ट्रीय धावपटू ऑलिम्पिक पदक विजेता विल्सन किपरॉप हा कुडाळ मध्ये दाखल झाला आहे. राणे हॉस्पिटल बरोबरच सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि डॉक्टर्स फ्रेटर्निटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या मॅरेथॉन स्पर्धंच आयोजन करण्यात आलं आहे. ५, १०, १६ आणि २१ किलोमीटर अंतराच्या या स्पर्धा असणार आहेत. आतापर्यंत देशभरातून सुमारे दोन हजार धावपटूंनी नोंदणी केली असल्याचं अजित राणे यांनी सांगितलं.
यावेळी विल्सन केपरॉप आणि अजित राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राणे हॉस्पिटलचे अजित राणे यांनी विल्सन केपरॉप यांच्या विषयी माहिती दिली. विल्सन केपरॉप याना विनंती केल्यावरून ते कोकणातील मुलांना ऍथलेटिक्सचे प्रशिक्षण द्यायला तयार आहेत. एखादी अकादमी स्थापन करायला आपण मदत करू असे श्री .राणे म्हणाले. त्याला विल्सन केपरॉप यांनी सुद्धा दुजोरा दिला. विल्सन केपरॉप म्हणाले, आज आपण या हाफ मॅरेथॉनचा मार्ग फिरलो. हा मार्ग खूप वेगळा आहे. मी आतापर्यंत जगातील वेगवेगळ्या मार्गावरून मॅरेथॉन धावलो आहे. पण हा मार्ग चढ-उताराचा आहे. हवेत आर्द्रता असल्याने ते एक वेगळे आव्हान आहे. त्यामुळे या मॅरेथॉनमध्ये आपण धावणार असल्याचे विल्सन केपरॉप यांनी सांगितले.
अजित राणे म्हणाले, हे या मॅरेथॉनचे तिसरे वर्ष आहे. यावर्षी आतापर्यंत दोन हजारच्या वर नोंदणी झाली आहे. दरवर्षी हि संख्या वाढतच चालली असल्याचे राणे म्हणाले. यावेळी डॉ. जी. टी. राणे यांनी देखील या मॅरेथॉन विषयी माहिती दिली. डॉ. प्रशांत मडव म्हणाले, यंदा इन्स्पिरेशन अवॉर्ड साठी देखील चांगला प्रतिसाद मिळाला असून त्याची संख्या ३०० पर्यंत पोहोचली आहे. पुढच्या वर्षी ५ किमी अंतरासाठी देखील विशेष सुधारणा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी या मॅरेथॉन स्पर्धेच्या टी शर्टचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या टी शर्टचे डिझाईन डॉ. प्रशांत सामंत यांची कन्या आर्या सामंत हिने केले आहे.
या पत्रकार परिषदेला डॉ. जी टी राणे, रुपेश तेली, शिवप्रसाद राणे, डॉ. जयसिंह रावराणे, डॉ. प्रशांत मडव, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. मिलिंद बोर्डवेकर, तसेच सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि डॉक्टर्स फ्रेटर्निटी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page