Headlines

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जुलैला विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

रक्तदान शिबिर, वृक्षवाटप, गुणवंतांचा सत्कार, गणवेश वाटप आणि विकासकामांचे भूमिपूजन

कणकवली : नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाढदिवसानिमित्त शहरात एक हजार वृक्षांचे वाटप करण्यात येणार असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये या उद्देशाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सुमारे ५०० रक्तदात्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. माजी उपसरपंच स्व. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे.

गरजू शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच दहावी, बारावी आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही आयोजित करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार १३ जुलै रोजी एचपीसीएल हॉल येथे होणार असून, त्याच ठिकाणी चित्रकला स्पर्धा आणि रक्तदान शिबिरही पार पडणार आहे.

याच दिवशी सायंकाळी ४ वाजता नगरपंचायतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. उड्डाणपुलाखालील परिसराच्या सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ, गणपती सान्याच्या परिसरातील सुशोभीकरण तसेच अन्य विकासकामांचा प्रारंभ यावेळी करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page