सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी:१८ विकासकामांच्या मुदतवाढीवरून वाद; पुरावे सादर करण्याचे आव्हान-प्रत्युत्तर, ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी; चौकशीचे नगराध्यक्षांचे आश्वास..
⚡सावंतवाडी ता.१०-: टक्केवारीच्या आरोपावरून सावंतवाडी नगर परिषदेच्या आजच्या मासिक सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली, विषय सूची वरील तब्बल अठरा विकास कामाच्या मुदत वाढीवरून या विषयाला पेव फुटला. दोन टक्काचे विषय सभागृहात मांडण्यापलीकडे अन्य विषय सावंतवाडी शहरात नाहीतच का असे खडे बोल त्यांनी अधिकारी यांना विचारत वेळ पडल्यास दोन टक्के चे पुरावे आपण सभागृहात सादर करू असा इशारा दिला. यावर सभापती सुधीर आडीवरेकर यांनी पुरावे सादर कराच असे आव्हान दिले, यावेळी चार विकास कामांचे पुरावे देत ही कामे पुर्ण होऊन, बिलापोटी प्रशासनाने काढलेले धनादेश महिना उलटला तरी अद्याप त्यांना का दिले नाही असा सवाल उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. या विषयावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बऱ्याच शाब्दिक चकमक उडून मध्ये झालेले वातावरण तंग बनले, यावर नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करत सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल असा निर्णय जाहीर करत या विषयाला बगल दिली.सावंतवाडी नगरपरिषदेची मासिक बैठक आज नगराध्यक्षा सौ.श्रद्धा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते.दरम्यान प्रभाग आठ मधील आरेकर मेस कडून शेखर पेडणेकर यांच्या घराकडे जाणारी पाणंद रुंदीकरण करण्यासाठी कुशल कामगार मिळत नसल्याने त्या कामाला मुदत वाढ देण्याबाबतचा विषय सभागृहात मांडण्यात आला या विषयावरून संजू परब चांगलेच आक्रमक झाले पाणंदी सारख्या कामाला कुशल कामगार मिळत नाही हे कितपत योग्य असून विषय सूचीवर तब्बल 18 विकास कामांना मुदतवाढ देण्याचे विषय घेणे म्हणजे आपण ठेकेदारांच्या शिफारसी या ठिकाणी घेऊन आलात का असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला तसेच आपले प्रशासनाशीसाठी लोटे आहेत का ? सावंतवाडी शहरात अजून अन्य कोणत्या समस्या नाही की त्या विषय सूचीवर घ्याव्यात. दोन टक्के चे विषय सभागृहात घ्यायच्या पेक्षा ठेकेदारांची विशेष सभा लावा. वेळ पडल्यास टक्केवारीच्या साठेलोटयाचे पुरावेच सभागृहात सादर करणार असे सांगितले .
यावेळी सभापती श्री अडीवडेकर यांनी पुरावे सादर कराच असे प्रति आव्हान श्री परब यांना दिले. यावेळी शहरातील तब्बल चार विकास कामांचे पुरावे सादर करत सदरची विकास कामे पूर्ण होऊन त्या विकास कामांच्या बिलापोटीचे धनादेश पालिका प्रशासनाकडून काढूनही एक महिना उलटला तरी ते संबंधित ठेकेदारांना अदा करण्यात आलेले नाही आहे. याचे उत्तर प्रशासनाने द्यावे असे स्पष्ट केले.
यावेळी सभापती श्री आडीवरेकर यांनी सदरची कामे अपूर्ण असल्याचा दाखला समोर केला मात्र प्रत्यक्षात प्रशासनानेच काम पूर्णत्वाचा दाखला दिला मग काम अपूर्ण असल्याचा प्रश्नच येत नाही असे श्री परब यांनी सांगितले.यावर श्री आडीवरेकर यांनी प्रशासनालाच जाब विचारत आपण दाखला कसा काय दिला असे विचारले यावर मुख्याधिकारी यांनी नगर अभियंत्याकडे बोट दाखवले एकूणच या विषयावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली झोपली अखेर वाद वाढत असतानाच नगराध्यक्ष यांनी सदर प्रकरणी आपण चौकशी लावू व यातून मार्ग काढू असे सांगत या विषयावर पडदा टाकला मात्र टक्केवारीचा विषय सभागृहामध्ये चांगलाच रंगला.
दुसरीकडे याच विषयाचा धागा पकडत नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी टक्केवारीवरून नगरपालिकेची बदनामी होत आहे हा सभागृहाचा अस्मितेचा प्रश्न आहे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सुद्धा 57 कोटीच्या नळ पाणी योजनेवरुन मुख्याधिकारी यांच्यावर अनुप केले त्यामुळे या गोष्टीचा मुख्याधिकारी या नात्याने आपण खुलासा करावा अशा प्रकारची प्रेस नोट आपण द्यावी अशी मागणी सभागृहात मांडली यावेळी सभापती आडिवरेकर हे चांगलेच आक्रमक झाले त्यांनी थेट सूर्याजी यांना रोखत श्री सागावकर यांनी नळपाणी योजने संदर्भात बोलू नये त्यांनीच या योजनेची पूर्ण वाट लावली असे आरोप केले मात्र श्री साळगावकर हे आपल्याच पक्षाचे असल्याचे सूर्याजी यांनी सांगितल्यास वर ते आता आमच्या पक्षात आले असे आडिवरेकर म्हणाले.
दुसरीकडे शहरातील कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पिरापर्यंत जाणाऱ्या नाला बंदिस्त करणे या कामाला मुदत वाढ देण्यावरून देव्या सूर्याजी तसेच देवा टेमकर यांनी आक्षेप घेत सदरचा ठेकेदार हा तकलादू कामे करतो त्यामुळे अशा ठेकेदाराला कामे न देता त्यांच्याकडून हे काम काढून घ्यावे त्याला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टमध्ये टाका अशी मागणी केली यावर योग्य ती चौकशी करून संबंधित ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला ब्लॅकलिस्ट केले जाईल असे आश्वासन नगराध्यक्ष सौ भोसले यांनी दिले.
तर नगरपरिषद अग्निशमन केंद्राचे विद्युतीकरण करणे जिमखाना मैदान येथील ड्रेसिंग रूमचे विद्युतीकरण करणे आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या बहुउद्देशीय सभागृहाचे विद्युतीकरण करणे या कामाच्या मुदत वाडीवरून नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी आक्षेप घेत संबंधित ठेकेदाराकडून योग्यरीत्या काम केले जात नसल्याचे सांगितले. तर जिमखाना ड्रेसिंग रूम चे काम अर्धवट थांबले असताना त्या कामाचे बिल अदा करण्यात आले आहे त्यामुळे संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याला ब्लॅक लिस्ट करण्यात यावे अशी मागणी केली मात्र बिल अदा केले असले तरी त्याची डिपॉझिट रक्कम शिल्लक आहेत योग्य काम न केल्यास त्याच्यावर ब्लॅक लिस्ट ची कारवाई केली जाईल असे नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले.
