नारायण राणे यांच्या रॅलीमध्ये अडथळा आणल्या प्रकरणी संदेश पारकर यांचें सह १० जण निर्दोष…

⚡देवगड ता.१५-:
दिनांक २८ जानेवारी २०२१ रोजी देवगड शहरात तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या काढण्यात आलेल्या भाजप जन आशीर्वाद यात्रा या रॅलीदरम्यान जमाव करून, घोषणा देवून, दगडफेक करून अडथळा आणल्याप्रकरणी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह १० जणांची देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री एस.एस. पचंडी यांनी सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे.याकामी देवगड येथील अँड कौस्तुभ मराठे व अँड सिद्धेश माणगांवकर यांनी बचाव पक्षाद्वारे काम पाहिले.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने जन आशीर्वाद यात्रा या नावाने ठिकठिकाणी रॅली आयोजित केल्या होत्या. मा. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा दुपारी १ वाजताचे सुमारास देवगड येथील शिवसेना पक्षाचे कार्यालयासमोरून जात असताना १) संदेश पारकर २) रविंद्र जोगल ३) निवृत्ती तारी ४) संतोष तारी ५) तुषार पेडणेकर ६)मिलिंद साटम ७)अमोल लोके ८)शरद लोके ९)सौरभ माने १०)लक्ष्मण तारी यांनी बेकायदेशीरपणे जमाव करून , दगडफेक करून,घोषणाबाजी करून सदर रॅलीमध्ये अडथळा आणला होता.

या प्रकरणी देवगड पोलिसांनी संशयित आरोपीवर भा.द.वि.कलम १४३, १४९, १८८,२६९,२७० सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.दरम्यान न्यायालयीन सुनावणीदरम्यान या गुन्ह्यातील साक्षीदारांच्या जबानीतील विसंगती व इतर बाबींच्या आधारे मा. देवगड न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

You cannot copy content of this page