⚡मालवण ता.१५-: कोळंब येथील श्री महापुरुष पार येथे मंगळवार दि. २० जानेवारी रोजी ब्राह्मण भोजन तसेच श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता लघुरुद्राने होणार असून दुपारी १२.३० वाजता महाआरती, त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता हळदीकुंकू, तर दुपारी ४ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होणार आहे. सायंकाळी ६ पासून तीर्थप्रसाद आणि ७ नंतर भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
