⚡मालवण ता.१५-:
चित्रपटसृष्टीत करिअर करण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण आणि सिने-कथा-कीर्तन (कुर्ला टू वेंगुर्ला) यांच्यावतीने एकदिवसीय ‘सिनेमा करिअर कार्यशाळे’चे आयोजन रविवार दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ वा. या वेळेत दादा शिखरे सभागृह, बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथे करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत चित्रपटसृष्टीतील विविध संधी, अभिनय, दिग्दर्शन, लेखन, तंत्रज्ञान, ऑडिशन प्रक्रिया तसेच प्रत्यक्ष अनुभवांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेत राष्ट्रीय व राज्यस्तरीय नामांकित तज्ज्ञ सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत १८ ते ३० वयोगटातील स्त्री व पुरुष सहभागी होऊ शकतात. प्रथम येणाऱ्या ५० जणांना प्रवेश दिला जाईल. सहभागासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी लक्ष्मीकांत खोबरेकर, संजय आचरेकर, वैभव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
