⚡वेंगुर्ला ता.१५-: अणसूर-मडकीलवाडी येथे मुलानेच जन्मदात्या आईवर गोळी झाडून तिचा खून केला असल्याची घटना बुधवारी रात्रौच्या सुमारास घडली. वासंती वासुदेव सरमळकर (वय 65) असे या मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश सरमळकर याने विविध बँका व बचत गटांकडून कर्ज घेतले होते. या कर्जाच्या कारणावरून मयत आई व आरोपी मुलामध्ये वारंवार वाद व भांडणे होत होती. दि.14 जानेवारी रोजी रात्री मयत वासंती सरमळकर या आपल्या घराच्या अंगणात खुर्चीवर बसलेल्या असताना आरोपी उमेश सरमळकर याने घराच्या छपरावर चढून हातातील बंदूकीने अंगणात बसलेल्या आईवर गोळी झाडली. ही गोळी मयत यांच्या डाव्या बाजूस छातीला लागल्याने त्या जागीच गंभीर जखमी झाल्या व त्यांचा मृत्यू झाला.
मुलानेच केला आईचा गोळी झाडून खून…
