सह्याद्रीतील गावांचे रक्षण; स्टॅलीन दयानंदांचा कोलझर भेटीवेळी संदेश…

दोडामार्ग :
दिल्ली लॉबीच्या माध्यमातून सह्याद्रीतील गावांची जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणारे तथाकथित गुंतवणूकदार म्हणजे या भागाला लागलेली कीड असून ती मुळापासून उखडून टाकली पाहिजे, असा घणाघात वनशक्ती संस्थेचे प्रमुख स्टॅलीन दयानंद यांनी कोलझर येथे केला.
कोलझर ग्रामस्थांनी “रक्ताच्या नात्याबाहेर कोणालाही जमीन विकणार नाही” असा ठाम निर्णय घेतला असून या लढ्यात पंचक्रोशीतील सर्व गावांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही स्टॅलीन दयानंद यांनी दिली. युवकांच्या सहभागाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी पर्यावरणवादी संदीप सावंत, देवस्थान कमिटी अध्यक्ष शामराव देसाई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी. पी. देसाई, कुंब्रलचे माजी सरपंच प्रवीण देसाई यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. इको सेन्सिटिव्ह क्षेत्राबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे स्पष्ट करत वृक्षतोड व उत्खननप्रकरणी न्यायालयात दाद दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page