२३ वर्षांच्या हत्ती उपद्रवाला निर्णायक वळण; पकड मोहिमेसाठी न्यायालयीन लढा…
दोडामार्ग :
दोडामार्ग तालुक्यात गेल्या २३ वर्षांपासून सुरू असलेल्या हत्ती उपद्रवावर तोडगा काढण्यासाठी हत्ती पकड मोहिमेसाठीचा लढा आता न्यायालयात जाणार आहे. मुख्य वनसंरक्षक (कोल्हापूर) यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी थेट न्यायालयात दावा दाखल करण्याचा ठाम निर्धार जाहीर केला.
यावेळी मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी न्यायालयाचे आदेश मिळताच हत्ती पकड मोहीम राबवली जाईल, अशी ग्वाही दिली. या बैठकीला शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष संजय देसाई, माजी जि. प. वित्त व बांधकाम सभापती तुकाराम बर्डे, शेतकरी राजाराम देसाई, समीर देसाई, सिंधुदुर्ग उपवनरक्षक मिलिश शर्मा, कोल्हापूर जिल्हा उपवनरक्षक यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हत्ती उपद्रवाच्या प्रश्नाला आता निर्णायक दिशा मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
