भाजपाप्रणित सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार अध्यक्षपदी प्रसन्ना देसाई…

आगार कार्याध्यक्षपदी विष्णू उर्फ पप्पू परब यांची निवड..

⚡वेंगुर्ला ता.१४-: भाजपाप्रणित सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार २०२६ ची कार्यकारीणी निवड करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांची आगार अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर आगार कार्याध्यक्षपदी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांची निवड करण्यात आली. वेंगुर्ला आगार सचिवपदी महादेव चंद्रकांत भगत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आगार उपाध्यक्षपदी विजय कोरे व मकरंद होळकर, आगार सहसचिवपदी वैभव मांजरेकर, महिला संघटक सचिवपदी सेजल रजपूत व सिद्धी परब, संघटक सचिवपदी रोहन नांदोस्कर व रुपेश तेंडुलकर यांची निवड करण्यात आली.सर्व पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यकारीणी निवड कार्यक्रमप्रसंगी भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे , सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ विभागीय सचिव भरत चव्हाण, विभागीय सहसचिव स्वप्नील रजपूत, विभागीय पदाधिकारी रोशन तेंडुलकर, संजय सावंत , प्रशांत गावडे उपस्थित होते. सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार सभासद, दाजी तळवणेकर, सखाराम सावळ, मिलिंद मयेकर, मनोहर वालावलकर, निखिल भाटकर, अक्षय येसाजी, अनंत झोरे, प्रकाश मोहिते, मनोज दाभोलकर, विनायक दाभोलकर, आशिष वराडकर, तेजस जोशी, इतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page