Headlines

प्रशासनाने पंचनामे व यादीची वाट न पाहता धान्य सरसकट वितरित करावे

भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांचे तहसीलदाराना निवेदन *⚡बांदा ता.३१-:* महापुराचा फटका बसल्यामुळे बांदा गावातील सुमारे ८०% जास्त घर ही बाधित झाली असून प्रशासनाने पंचनामे व यादी याची वाट न बघता सर्व नागरिकांना दुकानांवर मिळणारे धान्य हे सरसकट वितरित करावे आशी मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब…

Read More

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात प्रेमचंद जयंती साजरी

*⚡मालवण ता.३१-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात हिंदी विभागामार्फत प्रेमचंद जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. हंबीरराव चौगले यांनी लेखक प्रेमचंद यांच्या साहित्याचा आढावा घेत हिंदी साहित्यातील प्रेमचंद यांचे योगदान व साहित्यकाराची समाजाप्रति असलेली भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत, हिंदी विभागप्रमुख प्रा. हंबीरराव चौगले, प्रा….

Read More

जनसेवा प्रतिष्ठान तर्फे जिल्ह्यातील अतिवृष्टीमय भागात कोरोना प्रतिबंधक औषध वाटप-: डॉ.संजीव लिंगवत

*⚡वेंगुर्ले ता.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थिती,अतिवृष्टी यामुळे जनता त्रस्त झालेली असून जिल्ह्यात अजूनही कोरोनाचा फैलाव चालु आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत आहेत.कोरोनाची अत्यंत गंभीर लक्षणे थोपवायची ताकद कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथीक औषधामध्ये असुन कोरोना फैलाव या औषधामुळे मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.यांची नोंद घेऊन जनसेवा प्रतिष्ठान तर्फे पूरग्रस्त , अतिवृष्टी झालेल्या भागात कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथीक…

Read More

गोपुरीच्या स्वयंसेवकांनी चिपळूणमध्ये जात राबवली स्वच्छता मोहीम; पूरग्रस्तांनी मानले आभार

*⚡कणकवली दि.३१-:* चिपळूणमधील पूरपरिस्थिती ओसल्यानंतर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. या घाणीमुळे रोगाराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होतो. हा धोका लक्षात घेऊन गोपुरी आश्रमच्या स्वयंसेवकांनी चिपळूण गाठले आणि तेथील परिसराची स्वच्छता केली. ‘स्वच्छता आणि श्रमदान हीच खरी सेवा आहे’ हे संस्कार आप्पासाहेबांनी गोपुरी या आपल्या कर्मभूमीत रुजविले ते संस्कार आश्रमामध्ये आजही जिवंत असल्याचे उदाहरण आताच्या…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.३१-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 4,815.578 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 367.8460 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.22 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चौवीस तासात 55 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 59.8160, अरुणा – 78.2470,…

Read More

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 35 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.३१-:* जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 35 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 20.325 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2731.713 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 25(2658), सावंतवाडी –…

Read More

राजकीय पुढाऱ्यांचे मायनिंग हे उत्पादनाचे साधन बनले

अपर जिल्हाधिकारी हटाव पर्यावरण बचावसाठी मनसे मोर्चा काढणार:परशुराम उपरकर *⚡कणकवली ता.३१-:* खास. विनायक राऊत यांनी कळणे येथे भेट दिली असता तेथील नागरिकांनी मायनिंग रद्दची मागणी केली. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मायनिंग नकोच आहे परंतु सर्व राजकीय पुढाऱ्यांचे मायनिंग हे उत्पादनाचे साधन झाले. मायनिंगला पाठीशी घालण्याचे काम या लोकप्रतिनिधीकडून मन होत असून मायनिंगच्या विरोधात मनसेने यापूर्वी आवाज…

Read More

शेतात आढळले मगरीचे पिल्लू

वनविभागाच्या केले स्वाधीन *⚡दोडामार्ग ता ३१ सुमित दळवी-:* साटेली- भेडशी मध्ये शांतादुर्गा मंदिरा नजिक काल रात्री शेतात मगरीचे पिल्लू सापडले. मंदार नाईक या शेतकर्‍याने तिला पकडले व त्यानंतर तिला वनभिभागाच्या स्वाधीन करण्यात आले. या वेळी मंदार नाईक , मिलिंद धर्णे, सुहास दळवी , निखिल आदी ग्रामस्थ उपस्थित होते. व वनरक्षक कुडव , वनरक्षक भोसले आदि…

Read More

संजय गांधी निराधार योजनेची मालवणात ४१ प्रकरणे मंजूर

समिती अध्यक्ष मंदार केणी यांची माहिती *⚡मालवण दि.३१-:* संजय गांधी निराधार योजनेत मालवण तालुक्यातील ४१ नव्या गरजवंत लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती मालवण तालुका संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष मंदार केणी यांनी दिली. कोरोना काळात ज्या मुलांचे आई-किंवा वडील मयत झाले आहेत. किंवा ज्या महिलांचा पती मयत झाला आहे. अश्या विधवा स्त्रियांनाचा…

Read More

मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीच्या कायदेशीर सल्लागारपदी ऍड. प्रसाद खोबरेकर ऍड. शैलेंद्र मराठे यांची निवड

*⚡सांवतवाडी ता.३१-:* ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे च्या लीगल कायदेविषयक सल्लागार पदी ॲड शेलेंद्र मराठे व ॲड प्रसाद खोबरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेची मासिक मासिक सभा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये गावाच्या विकासात्मक दृष्ट्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या सभेत सरपंच हेमंत मराठे यांनी ग्रामपंचायत करीता कायदेविषक सल्लागार म्हणून ॲड…

Read More
You cannot copy content of this page