जनसेवा प्रतिष्ठान तर्फे जिल्ह्यातील अतिवृष्टीमय भागात कोरोना प्रतिबंधक औषध वाटप-: डॉ.संजीव लिंगवत

*⚡वेंगुर्ले ता.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थिती,अतिवृष्टी यामुळे जनता त्रस्त झालेली असून जिल्ह्यात अजूनही कोरोनाचा फैलाव चालु आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत आहेत.कोरोनाची अत्यंत गंभीर लक्षणे थोपवायची ताकद कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथीक औषधामध्ये असुन कोरोना फैलाव या औषधामुळे मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.यांची नोंद घेऊन जनसेवा प्रतिष्ठान तर्फे पूरग्रस्त , अतिवृष्टी झालेल्या भागात कोरोना प्रतिबंधक होमिओपॅथीक औषध व कोरोना माहिती पत्र वाटप करण्यात येणार आहे. तसेच ज्या गरजु व्यक्तींना सदर होमिओपॅथीक औषध मोफत पाहिजे असल्यास डॉ.संजीव लिंगवत होमिओपॅथीक क्लिनिक मेनरोड वेंगुर्ले येथे 9421268268 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. ( सदर उपक्रमास कोणालाही अर्थ सहाय्य करायचे असल्यास सारस्वत को.आँप.बँ.लि. वेंगुर्ले, IFSC: SRCB0000039, Acc. No.039200100020190 Phone pay 9403560805) – डॉ.संजीव लिंगवत एम्. डी. ( होमिओपॅथी) अध्यक्ष:जनसेवा प्रतिष्ठान. क्लिनिक:आशिर्वाद अपार्टमेंट,पहिला मजला, बँ.खर्डेकर मेन रोड,वेंगुर्ले,सिंधुदुर्ग,महाराष्ट्र. संपर्क: 9421268268 ( Whatsapp & Calling )

You cannot copy content of this page