स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात प्रेमचंद जयंती साजरी

*⚡मालवण ता.३१-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात हिंदी विभागामार्फत प्रेमचंद जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा. हंबीरराव चौगले यांनी लेखक प्रेमचंद यांच्या साहित्याचा आढावा घेत हिंदी साहित्यातील प्रेमचंद यांचे योगदान व साहित्यकाराची समाजाप्रति असलेली भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत, हिंदी विभागप्रमुख प्रा. हंबीरराव चौगले, प्रा. डॉ. आर. एन. काटकर, प्रा. अन्वेषा कदम आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. के. के. राबते यांनी केले. यावेळी डॉ. आर. एन. काटकर, प्रा. बी. एच. चौगुले, व प्रा. एस. पी. खोबरे यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. तर आभार प्रा. अन्वेषा कदम यांनी मानले. यावेळी प्रा. डॉ. डी. व्ही. हारगिले, प्रा. हसन खान, प्रा. मिलन सामंत, प्रा. धामापूरकर, श्री. के. टी. साळुंखे, श्रीमती बेळेकर, व कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page