भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांचे तहसीलदाराना निवेदन
*⚡बांदा ता.३१-:* महापुराचा फटका बसल्यामुळे बांदा गावातील सुमारे ८०% जास्त घर ही बाधित झाली असून प्रशासनाने पंचनामे व यादी याची वाट न बघता सर्व नागरिकांना दुकानांवर मिळणारे धान्य हे सरसकट वितरित करावे आशी मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदनाद्वारे केली आहे. प्रसिद्ध पत्रकात खतीब म्हणाले गेल्या आठवड्यात महापुराचा फटका बांदा परिसराला बसला असून शेकडो कुटुंबे या पुरामुळे बाधित झाली आहेत मात्र शासनाकडे केवळ पन्नास कुटुंबांची नोंद करण्यात आली असून मोफत मिळणाऱ्या धान्यापासून इतर कुटूंबांना वंचित राहावे लागलत आहे असे या निवेदनात म्हणण्यात आले आहे.
