पंचम खेमराज महाविद्यालयाचा द्वितीय वर्ष बीएस्सीचा 100% निकाल;

स्नेहा कुंभार 98% गुण मिळवत विज्ञान विभागातून महाविद्यालयात प्रथम

*⚡सावंतवाडी ता.३१-:* मुंबई विद्यापीठांतर्गत एप्रिल 2021 मध्ये घेण्यात आलेल्या द्वितीय वर्ष बी एस्सीचा श्री पंचम खेमराज महाविद्यालयात चा निकाल शंभर टक्के लागला यामध्ये वनस्पतीशास्त्र विषयाची स्नेहा उत्तम कुंभार हिने 98% गुण मिळवत विज्ञान विभागातून महाविद्यालयात प्रथम क्रमांक येण्याचा सन्मान मिळवला तृतीय क्रमांक वनस्पतिशास्त्राच्या स्नेहल संजय देसाई हिने 96.75 टक्के गुण मिळवून पटकावला तर तृतीय क्रमांक प्राणीशास्त्र विभागाच्या सबा इब्राहिम शेख हिने 96.25 टक्के गुण मिळवून पटकावला . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजसाहेब खेमसावंत भोसले कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी भोसले कार्यकारी विश्वस्त युवराज लखन राजे भोसले सहसंचालक डी टी देसाई सदस्य जयप्रकाश सावंत सतीश सावंत महाविद्यालयाचे प्राचार्य डी एल भारमल यांनी अभिनंदन केले

You cannot copy content of this page