ग्रामविकास प्रक्रिया लोकाभिमुख करण्यासाठी समित्यांचा सहभाग आवश्यक

हर्षदा वाळके;कलम ४९ अन्वये ग्रामविकास समित्यांची रचनात्मक बांधणी

*⚡कणकवली दि.३१-:* ग्रामपंचायत स्तरावर कलम ४९ अन्वये ग्रामविकास समित्यांची रचनात्मक बांधणी केली असून यात ५०%महिलांची भागीदारी बंधन कारक आहे व या समितीने येणाऱ्या निधीतून कामकाज कसे करावे तसेच यासाठी समितीतील सदस्यांचा सहभाग वाढविण्यासाठी महीला राजसत्ता आंदोलनच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. नांदगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे सदर प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावेळी महीला राजसत्ता आंदोलनच्या कोकण समन्वय सौ.हर्षदा वाळके यांनी उपस्थित सदस्य यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकशाही प्रक्रियेद्वारे व्यापक आधार व सर्वांचा सहभाग असलेली आणि थेट सामुहिक निर्णय प्रक्रिया बळकट करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कलम ४९ अन्वये ग्रामविकास समित्यांची रचना करणयाचा निर्णय घेण्यात आला.ज्यामध्ये ५०%महिलांची भागीदारी बंधन कारक आहे.काही समित्यांना शासनाच्या योजनेतून दरवर्षी निधी प्राप्त होतो. त्याच्या वापराची दिशा व धोरण या समितीने ठरवायचे असते.समितीतील सदस्यांचा सहभाग ग्रामविकास प्रक्रिया लोकाभिमुख करण्यासाठी समित्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक आवश्यक असल्याचे मत हर्षदा वाळके यांनी व्यक्त केले आहे. सक्रिय सहभाग वाढावा यासाठी समिती सदस्यांचे प्रशिक्षण घेण्याची गरज असते आणि असे पूर्ण होताना दिसत नव्हती म्हणून . विकेंद्रित पंचायत राज व्यवस्था बळकटीकरणासाठी व समित्या सक्रिय होण्यासाठी प्रशिक्षणाची गरज ओळखून महिला राजसत्ता आंदोलनाच्या वतीने,ग्रामदृष्टी प्रकल्पांतर्गत विविध समित्यांचे पदाधिकारी व सदस्य यांच्यासाठी ग्रामपंचायत नांदगाव येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असल्याचे सौ. वाळके यांनी शेवटी सांगितले . या प्रशिक्षणास महिला राजसत्ता आंदोलनाच्या कोकण विभाग समन्वयक हर्षदा वाळके व कोळोशी सरपंच रितिका सावंत यांनी मार्गदर्शन केले.यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावळेकर, आयनल सरपंच बापू फाटक, नांदगाव उपसरपंच निरज मोरये, असलदे उपसरपंच संतोष परब, नांदगाव ग्रामविस्तार अधिकारी श्री.हरमलकर,कोळोशी ग्रामसेवक श्री.राणे.भाई मोरजकर, पंचायत सखी अनामिका गगनग्रास,प्रणाली मेस्त्री, शिल्पा इंगळे, सानिका तांबे उपस्थित होते.सहभागी प्रशिक्षणार्थींनी चर्चेत सहभाग घेतला.सर्वांचे आभार मानून प्रशिक्षणाची सांगता झाली.

You cannot copy content of this page