*⚡सांवतवाडी ता.३१-:* लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्त गरजू कुटुंबांना आज अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील मणेरी खालची बाजारवाडी, आवडे,परमे, साटेली, भेडशी खानयाळे, गावातील सुमारे 35 कुटुंबांना अन्न धान्य व कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी लायन्स क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष ला. अँड. परिमल नाईक, सचिव ला अमेय पै, उपाध्यक्ष ला. विद्याधर तावडे, खजिनदार ला प्रसाद राऊत, ला. अशोक देसाई, ला. संतोष चोडणकर, ला. संदेश परब, ला. गजानन नाईक, ला. नरेंद्र देशपांडे, ला. बाळ बोर्डेकर, ला. महेश पाटील, ला. रवींद्र सावंत,. आदी लायन सदस्य तसेच गाव सरपंच व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
लायन्स क्लब सावंतवाडीच्या वतीने पूरग्रस्तांना मदत
