कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 35 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.३१-:* जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 35 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 20.325 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2731.713 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 25(2658), सावंतवाडी – 25(2940.10), वेंगुर्ला – 4.60 (2235.60), कुडाळ – 35(2604), मालवण – 24(2970), कणकवली – 30(2987), देवगड – 06(2396), वैभववाडी – 13(3061), असा पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page