*⚡सांवतवाडी ता.३१-:* ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे च्या लीगल कायदेविषयक सल्लागार पदी ॲड शेलेंद्र मराठे व ॲड प्रसाद खोबरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेची मासिक मासिक सभा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये गावाच्या विकासात्मक दृष्ट्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या सभेत सरपंच हेमंत मराठे यांनी ग्रामपंचायत करीता कायदेविषक सल्लागार म्हणून ॲड शेलेंद्र मराठे व ॲड प्रसाद खोबरेकर यांची नेमणूक करण्याचा ठराव सभेत मांडला असता सर्वच सदस्यांनी त्याला पाठिंबा दिल्याने सरपंच मराठे यांनी या दोघांचीही कायदेविषयक सल्लागार पदी नियुक्ती केली. तंटामुक्ती समितीतील वाद सामंजस्याने मिटवण्यासाठी या दोघांची मदत घेतली जाणार आहे. तसेच गावातील कोणत्याही व्यक्तींला कायदेविषयक सल्ल्याची गरज असेल या दोन्ही वकीलाकडून सदर व्यक्तीला मोफत सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.ग्रामपंचायतला कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक करण्याच्या निर्णयाचे गावातील लोकांनीही स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.कायदेविषयक सल्लागार म्हणून वकिलांची नेमणूक करण्याचा मळेवाड कोंडूरेने ग्रामपंचायत ह्या जिल्ह्यातील पहिल्याच ग्रामपंचायतने निर्णय घेतला आहे.
मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीच्या कायदेशीर सल्लागारपदी ऍड. प्रसाद खोबरेकर ऍड. शैलेंद्र मराठे यांची निवड
