पहाटे 3 वाजल्यापासून रांगा;लसीअभावी माघारी परतण्याची वेळ
*⚡कणकवली दि.३१-:* कणकवलीत लसीकरण केंद्रावर लस कमी आणि लाभार्थी जास्त येत अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड उडत असून लस न मिळाल्याने आरोग्य विभागालाच संतापाचे डोस सहन करावे लागत आहेत.कणकवली कॉलेज येथे लसीकरण केंद्रावर केवळ १४० डोस उपलब्ध होते मात्र पहाटे ३ वाजल्यापासून रांग लावली तरी देखील डोस मिळत नसल्याने कणकवलीकरांची घोर निराशा झाली. अनेकांना डोस घेता परतावे लागले. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.परंतु लसीकरण केंद्रावर कमी प्रमाणात लस पुरवठा होत असल्याने लसीकरणाची मोहीम संथगतीने सुरू आहे.कणकवली कॉलेज येथे लसीकरण केंद्रावर ऑनलाइन व ऑफलाइन डोस देण्यात आले. यामध्ये ऑफलाइनसाठी सकाळी 3 वाजल्यापासून काही जणांनी येऊन नंबर लावले होते पण यामध्ये ही फक्त 35 जणांना टोकण दिल्याने सकाळी 8 दरम्यान लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाला होता. यावेळी संतप्त नागरिकांना विचारणा केली असता दुसरा डोस देखील काही जणांना द्यावें लागतात त्यामुळे फक्त 35 जनांणाच डोस मिळणार असे सांगण्यात आले. लसीकरण केंद्रावर किती लस उपलब्ध आहेत याची माहिती विविध माध्यमातून नागरिकांन पर्यंत पोहचते.त्यानंतर नागरिक केंद्रावर पहाटे पासूनच रांगा लावतात.त्यावेळी त्यांना लसी कमी आल्याचे कळते.यामुळे पहाटेपासून उभे राहूनही लस मिळत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे शासन कोरोना लसीकरणासाठी आग्रही असून दुसऱ्या बाजूने मात्र लस उपलब्ध करून दिली जात नाही.त्यामुळे या सावळा गोंधळामुळे नागरिकांची मात्र ससेहोलपट होत असून याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.
