स्वराज्य ग्रुप सिंधुदुर्गतर्फे चिपळूण कोंडे गावातील पूरग्रस्तांसाठी मदत

*⚡कणकवली दि.३१-:* पूरग्रस्तांसाठी स्वराज्य ग्रुप सिंधुदुर्ग तर्फे चिपळूण कोंडे गावात मदत देण्यात आली .या साहीत्यामध्ये पाणी बॉक्स, तूरडाळ , रिन साबण, लक्स साबण, कोलगेट,तांदूळ पीट,गव्हाचे पीट, व्हिम साबण, मारी बिस्कीट आणि दैनंदिन जीवनावश्यक गरजेच्या वस्तूंचा पुरवठा चिपळूण मधील कोंडे या गावातील पूरग्रस्तांना करण्यात आला. यावेळी उपस्थित कोंडे गावातील उपसरपंच हसन खान, माजी सरपंच शशिकांत साळवी, स्वराज्य ग्रुप सिंधुदुर्ग चे सदस्य प्रसाद सुखटणकर,किरण मालपेकर, ऋषिकेश मालपेकर, संदीप मडव, राजू आलव आणि कोंडे गावातील पूरग्रस्त उपस्थित होते.सदर कार्यक्रम हा चिपळूण तहसीलदार यांच्या सुचनेनुसार कोंढे गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आला. कोंडे गावातील उपसरपंच व पूरग्रस्तांनी स्वराज्य ग्रुप सिंधुदुर्गचे आभार मानले आहे.

You cannot copy content of this page