कुडाळ भंडारी समाजाकडून ज्ञाती बांधवाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सुरभाचीवाडीतील १६ कुटुंबाला केले वाटप

*⚡कुडाळ ता.३१-:* कुडाळ तालुका भंडारी समाज यांच्यावतीने गाव गावातील सुरभाचीवाडी येथील सोळा भंडारी समाजातील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कुडाळ तालुका भंडारी समाजाच्या पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले. एका कार्यक्रमा दरम्यान या कुटुंबांना कोरोना विषाणूची लागण झाली होती .त्यामुळे सदर कुटुंबांची गैरसोय लक्षात घेता हे वाटप करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर ,उपाध्यक्ष राजन कोरगांवकर. सचिव शरद पावसकर, सरचिटणीस विजय कांबळे, सदस्य दर्शन कुडव, दीपक राऊत, रमेश हरमलकर, नागेश करलकर, आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page