भरपाई न मिळाल्यास एकही डंपर कळणे मायनिंग येथून बाहेर पडू देणार नाही

राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी : शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न

*⚡सांवतवाडी ता.३१-:* कळणे मायनिग येथे भूस्खलनात होऊन शेतकऱ्यांची झालेली नुकसानभरपाई तातडीने न मिळाल्यास एकही डंपर कळणे मायनिंग येथून बाहेर पडू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिला आहे. तर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले जिल्हाध्यक्ष अमित सामंत दोडामार्ग राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी दळवी यांनी सांगितले.

You cannot copy content of this page