जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सावंतवाडी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन घेतले गणेश दर्शन
सावंतवाडी-:राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, उद्योग व्यापार जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, प्रसाद दळवी, धोंडी दळवी, अमोल दळवी,विशाल देसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
