*💫कणकवली दि.०२-:* कणकवली शहरालगतच्या एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळून नेल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे त्या अल्पवयीन मुलीचे आई वडील हे आंब्रड येथील एका दवाखान्यात पाय दुखत असल्याने उपचारासाठी गेले होते. या दरम्यानच्या कालावधीत त्या मुलीने कामानिमित्त कणकवली येथे जाते असे सांगत घराला टाळे घालून लहान बहिणीकडे चावी दिली. यावेळी तिने कपडे , मोबाईल अशा वस्तू सोबत नेल्याचे समजते. कुटुंबीयांनी शोध घेऊनही ती मुलगी सापडून न आल्याने तिच्या वडिलांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार संशियता विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे करीत आहेत.
अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या अज्ञाताविरोधात कणकवली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
