आडारी डम्पिंग ग्राउंडला भीषण आग…

*अग्निशमन बंब नसल्याने कुडाळ आणि वेंगुर्ला येथून मागवला बंब; मात्र पुन्हा एकदा अग्निशमन बंबाचा प्रश्न ऐरणीवर*

*💫मालवण दि०२-:* मालवण आडारी येथील नगरपालिकेच्या कचरा डम्पिंग ग्राउंड मध्ये बुधवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. वाऱ्याने भडकलेल्या या आगीत विविध प्रकारचा सुका व ओला कचरा जळून खाक झाला. मालवण नगरपालिकेचा अग्निशमन बंब नसल्याने नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मिळेल त्या साधनाने पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. या आगीच्या निमित्ताने अग्निशमन बंबाच्या कमतरतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मालवण शहरात आडारी येथे मालवण नगरपालिकेचे कचरा डम्पिंग ग्राउंड आहे. शहरातील विविध प्रकारचा कचरा याठिकाणी आणून टाकला जातो. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे उपक्रम नगरपालिका याठिकाणी राबवत असून काही दिवसांपूर्वी कचऱ्याचे बायोमायनिंगचे कामही नगरपालिकेने सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर कचरा डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याला अचानक आग लागली नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात न आल्याने वेंगुर्ला आणि कुडाळ येथील अग्निशमन बंब बोलाविण्यात आले आहेत

You cannot copy content of this page