*मबैठकीत चिपी विमानतळाबाबत मोठा निर्णय : ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आयआरबी कंपनीने दिले आश्वासन
*💫कुडाळ दि.०३-:* महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मंत्रालय येथे झालेल्या बैठकीमध्ये आज सिंधुदुर्ग मधील चिपी विमानतळाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. चिपी विमानतळाचे तांत्रिक काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन आयआरबी कंपनीने दिले. एमआयडीसी, आयआरबी, एमएसईबी, बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी तसेच पाणीपुरवठा अधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार तथा लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या मागणीनुसार सुभाष देसाई यांनी मंत्रालयात बोलाविली होती. या बैठकीमध्ये विमानतळ वाहतूक लवकरात लवकर सुरू करण्याबाबत चर्चा झाली. सुभाष देसाई यांनी आदेश दिल्याप्रमाणे आयआरबीचे वरिष्ठ अधिकरी सुधीर हौसिंग यांनी ३१ डिसेंबरपर्यंत सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून २० जानेवारीपर्यंत डिजीसीए कडून परवाना मिळविला जाईल, असे आश्वासन दिले