शहरातील दोन विकास कामांचा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते शुभारंभ

*💫वेंगुर्ला दि०४-:* वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते शहरातील दोन विकास कामांचा शुभारभ करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, गटनेते सुहास गवंडळकर, नगरसेवक शितल आंगचेकर, कृपा गिरप, प्रशांत आपटे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, नगरअभियंता अभिषेक नेमाणे, रचना सहाय्यक प्रितम गायकवाड, नागरीक रफीक शेख, अस्लम शेख, कांता भैरट, प्रितम सावंत, जॉन्सन फर्नांडीस आदी उपस्थित होते….

Read More

संवाद समन्वयात ग्राहक कल्याण-अरुण वाघमारे.

*💫वैभववाडी दि.०४-:* आपण आपल्या समाजाचे देणे लागतो या भावनेतून समाजातील दीनदुबळ्या, अडलेल्या, नडलेल्या सर्वसामान्याला मदत करणे हीच खरी समाजसेवा आहे. भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेचा कार्यकर्ता हा संवाद समन्वयात ग्राहक कल्याण साधण्यासाठी प्रयत्नशिल असला पाहिजे असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी केले….

Read More

नांदगाव येथे कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन

*💫कणकवली दि.०४-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव तीठा येथे कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन नुकतेच सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सचिन कृषी सेवा केंद्र म्हणून सुरू करण्यात आलेल्या या उद्घाटन प्रसंगी ओटव सरंपच हेमंत परूळेकर, असलदे सरपंच तथा व्यापरी संघटना अध्यक्ष पंढरी वांयगणकर, उपाध्याक्ष मारूती मोरये, सचिव कमलाकर महाडीक,शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे ,बाबजी शिंदे ,आदम…

Read More

आमदार वैभव नाईक यांनी आणलेला कोट्यावधीचा निधी फक्त कागदावरच

*नगराध्यक्ष ओंकार तेली यांचा आमदार वैभव नाईक यांना टोला *💫कुडाळ : दि.०४-:* आमदार वैभव नाईक हे केवळ कोट्यावधीचा निधी आणतात, पण त्यांनी आणलेला तो निधी नेहमीच कागदावर असतो, असा जोरदार टोला नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आमदार वैभव नाईक यांना लगावला आहे. कोविड काळात कोणतेही राजकारण न करता नगरपंचायतीने कुडाळ शहर कोरोना मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले….

Read More

बावशी शाखाप्रमुख पदी महेंद्र मर्ये तर युवा सेना शाखाप्रमुख सुरज नार्वेकर यांची निवड….

*💫कणकवली दि.०४-:* कणकवली तालाक्यातील बावशी गावातील शिवसेनेच्या शाखप्रमुख पदी महेंद्र मर्ये यांची निवड झाली असून युवा सेनेच्या शाखप्रमुख पदी सुरज नार्वेकर यांची निवड झाली  आहे .नुकतीच शिवसेनेच्या कणकवली येथे मेंळावा संपन्न झाला यावेळी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत .तसेच तोंडवली –बावशी या ग्रुप ग्रा.पं.ची मुदत संपून प्रशासक नेमणूक झाली असून केव्हाही निवडणूक जाहीर होवू शकते…

Read More

महिला पतंजली योगसमिती कोकण प्रांताच्यावतीने महिलांसाठी ऑनलाईन योगशिबिर….

*💫कणकवली दि.०४-:* स्वामी रामदेव प्रणित पतंजली महिला समितीच्या कोकण प्रांत यांच्यावतीने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यांसाठी ऑनलाइन सहयोग शिक्षक प्रशिक्षण (वर्ग-२) दि.२१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०२० या कालावधीत सुरू आहे. सदर शिबिरामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मुंबई, पुणे, गोवा या भागातून एकूण ८३ प्रशिक्षणार्थी योगाचे उत्तम प्रशिक्षण घेत आहे. या शिबिराचा मुख्य हेतू…

Read More

पत्रकार नितीन गावडे यांना पितृशोक

*💫मालवण दि०४-:* मालवण तालुक्यातील चौके येथील रहिवासी गणपत काशिराम गावडे ( वय- ८२) यांचे आज शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. चौके येथील पत्रकार नितीन गावडे यांचे ते वडील होत. गणपत गावडे हे पूर्वीच्या काळी बैलगाडी व्यावसायिक होते. या बरोबरच त्यांनी शेती, चिरेखाण व्यवसाय करून परिसरात नावलौकिक मिळवला होता. चौके…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालयात १२ डिसेंबर रोजी लोक अदालतचे आयोजन

*वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी लोक अदालत मध्ये सहभागी होण्याचे जिल्हा विधी प्राधिकरण अध्यक्ष हांडे आणि सचिव दीपक म्हालटकर यांचे आवाहन *💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सुचनेनुसार दिनांक १२ डिसेंबर २०२० रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून, लोक अदालत सिंधुदुर्ग ओरोस आणि तालुका न्यायालयात सकाळी…

Read More

मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापनदिनानिमित पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर….

*💫वेंगुर्ला दि.०३-:* सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापनदिनानिमित वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीतर्फे येथील ग्रामीण रुणालयात तालुक्यातील पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. आज सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात तालुक्यातील पत्रकारांची रक्तदाब, मधूमेह वगैरे मोफत तपासणी ग्रामीण रुणालयाचे वैद्यकीय अधिकारी पंडीत डवले, डॉ. प्रल्हाद मणचेकर आणि…

Read More

मळगाव बाजारपेठेत शुकशुकाट

*बाजारपेठेत ग्रामपंचायतीतर्फे जंतुनाशक फवारणी : अत्यावश्यक सेवा सुरू *💫सावंतवाडी दि.०३-:* सहदेव राऊळ : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बाजारपेठ सॅनिटाईझ करण्याच्या पार्श्वभूमीवर आज मळगाव बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळता दुपारनंतर बंद ठेवण्यात आली. यावेळी बाजारपेठेत ग्रामपंचायतीतर्फे जंतुनाशक फवारणी करण्यात आली. बाजारपेठेतील सर्वच दुकाने बंद असल्यामुळे बाजारपेठेत पूर्णतः शुकशुकाट जाणवत होता. मळगाव परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने मळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने मळगाव…

Read More
You cannot copy content of this page