*बाजारपेठेत ग्रामपंचायतीतर्फे जंतुनाशक फवारणी : अत्यावश्यक सेवा सुरू
*💫सावंतवाडी दि.०३-:* सहदेव राऊळ : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बाजारपेठ सॅनिटाईझ करण्याच्या पार्श्वभूमीवर आज मळगाव बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळता दुपारनंतर बंद ठेवण्यात आली. यावेळी बाजारपेठेत ग्रामपंचायतीतर्फे जंतुनाशक फवारणी करण्यात आली. बाजारपेठेतील सर्वच दुकाने बंद असल्यामुळे बाजारपेठेत पूर्णतः शुकशुकाट जाणवत होता. मळगाव परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने मळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने मळगाव बाजारपेठ तसेच परिसर सॅनिटाईझ करण्यासाठी बाजारपेठ दुपारनंतर बंद ठेवण्यात आली. डॉक्टर, मेडिकल आदी अत्यावश्यक सेवा फक्त सुरू होत्या. यावेळी ग्रामपंचायतीतर्फे संपूर्ण बाजारपेठेत जंतुनाशक फवारणी करून बाजारपेठेत निर्जंतुकीकरण करण्यात आले. मुख्य बाजार पेठ, ग्रामपंचायत परिसर, रस्तावाडा, वेंगुर्ला पोलीस लाठी परिसरआदी भागात ही जंतुनाशक फवारणी करण्यात आली. या कार्यात ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी व मळगावातील सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.