संवाद समन्वयात ग्राहक कल्याण-अरुण वाघमारे.

*💫वैभववाडी दि.०४-:* आपण आपल्या समाजाचे देणे लागतो या भावनेतून समाजातील दीनदुबळ्या, अडलेल्या, नडलेल्या सर्वसामान्याला मदत करणे हीच खरी समाजसेवा आहे. भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेचा कार्यकर्ता हा संवाद समन्वयात ग्राहक कल्याण साधण्यासाठी प्रयत्नशिल असला पाहिजे असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांनी केले. पुणे महानगर आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा, कोकण व राज्य कार्यकारणी यांची विशेष सभा जिओमिट अॕपव्दारे आॕनलाईन पध्दतीने संपन्न झाली. यावेळी संस्थेच्या नवोदित कार्यकर्त्यांना संस्थेची व संस्थेच्या कार्याची ओळख करुन देताना वाघमारे बोलत होते. सभेच्या सुरुवातीला ग्राहक चळवळीचे अधिष्ठान स्वामी विवेकानंद आणि भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांना अभिवादन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्य चांगल्या प्रकारे सुरु असल्याबद्दल जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांचे अरुण वाघमारे यांनी कौतुक केले. या ऑनलाईन सभेमध्ये सिताराम कुडतरकर-कणकवली, विष्णू दळवी-कुडाळ,प्रमोद कोणकर-रत्तागिरी, प्रणिता वैराळ-मुंबई,वैशाली रोगे-ठाणे, सुधीर नकाशे-वैभववाडी,वैदेही जुवाटकर-मालवण, परिणिता वर्तक-सावंतवाडी, अनंत नाईक-सावंतवाडी आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page