बावशी शाखाप्रमुख पदी महेंद्र मर्ये तर युवा सेना शाखाप्रमुख सुरज नार्वेकर यांची निवड….

*💫कणकवली दि.०४-:* कणकवली तालाक्यातील बावशी गावातील शिवसेनेच्या शाखप्रमुख पदी महेंद्र मर्ये यांची निवड झाली असून युवा सेनेच्या शाखप्रमुख पदी सुरज नार्वेकर यांची निवड झाली  आहे .नुकतीच शिवसेनेच्या कणकवली येथे मेंळावा संपन्न झाला यावेळी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत .तसेच तोंडवली –बावशी या ग्रुप ग्रा.पं.ची मुदत संपून प्रशासक नेमणूक झाली असून केव्हाही निवडणूक जाहीर होवू शकते यामुळे येथे पक्षांतर्गत हालचालींना वेग आली असून यातच सेनेच्या बावशी येथे नव्याने दोन पदाधिकारी यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे या परिसरातून अभिनंदन केले जात आहे .   कणकवली येथे सेनेच्या मेळाव्यानंतर बावशी येथील पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली याप्रसंगी सेनेचे कामगार संघटनेचे अध्यक्ष आप्पा पराडकर ,सोबत संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर ,दिपक कांडर आदी तरूण वर्ग दिसत आहे .

You cannot copy content of this page