अन्यायकारक वीजबिलात सवलत देण्यासाठी भाजपचा विज कार्यालयाला घेराव

वीजबिलात सवलतीसाठी भाजप कडून अभियंताना देण्यात आले निवेदन*

*💫सावंतवाडी दि.०३-:* लॉक डाऊन काळात आलेल्या भरमसाठ वाढीव वीजबिलात सवलत द्यावी यासाठी सावंतवाडी शहर भाजप कडून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत महाविकासआघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

यावेळी विजबिलात सवलत देण्यात यावे यासाठी अधीक्षक अभियंता याना निवेदन देऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करावी असे सांगत जाब विचारण्यात आला आहे. तसेच वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांवर जबरदस्ती करू नये अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, शहर अध्यक्ष अजय गोंदवळे, मोहीनी मडगावकर, नगरसेवक परिमल नाईक, आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, राजू बेग, तसेच पदाधिकारी परिणीती वर्तक, दिलीप भालेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page