उद्धव ठाकरे कोकणच्या जीवावरच मुख्यमंत्री – राजन तेली
*💫सावंतवाडी दि.०३-:* वाढीव विजबिल विरोधात भाजप तर्फे राज्यभरात आंदोलन करण्यात आली आहेत. यावेळी सावंतवाडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ऊर्जा मंत्री राऊत यांनी वीजबिल माफ केले जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु ८ दिवसात त्यांनी आपला निर्णय बदलत विजबिल आम्ही माफ करू शकत नाही हे विज बिल ग्राहकांना भरावेच लागेल तसेच ज्यांची तक्रार असेल त्यांचा विचार केला जाईल असे विधान त्यांनी केले आहे. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सर्व नेते वेगवेगळी विधाने बोलत असल्याने त्यामुळे या सरकार मध्ये कोणाचे ताळमेळ नसल्याने सर्व सामान्य जनतेला विजबिलात यांचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकणच्या जीवावरच मुख्यमंत्री झाले असल्याचे मत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मांडले आहे.