जिल्हा बँकेची बदनामी आम्ही करत नाही; राजन तेली यांचे स्पष्टीकर
*💫सावंतवाडी दि.०३-:* आम्ही जिल्हा बँकेची बदनामी करत नसून आमचा रोष फक्त बॅंकेच्या अध्यक्षांवर असल्याचे स्पष्टीकरण राजन तेली यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले आहे. ते म्हणाले जिल्हा बँके मध्ये अनधिकृतपणे केलेली नोकर भरती ही पुढील निवडणूक लक्षात घेऊन केली असून, ती चुकीची आहे असे ते म्हणाले आहेत. जिल्हा बँकेत होणारे व्यवहारावर आपला पूर्ण विश्वास असून त्याच्यात होणारा कारभार हा योग्य प्रकारेच होत आहे. तसेच तेथील कर्मचाऱ्यांवर देखील आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्यानी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.