⚡मालवण ता.०८-:
मालवण तालुक्यातील कुसरवेवाडी येथील प. पू. राणे महाराज मठात गुरुवार दि. १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन राणे महाराज ट्रस्ट व राणे महाराज भक्तगण यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
यानिमित्त सकाळी ९ वाजता राणे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक व पादुका पूजन, ११ वाजता हरिनाम जप व नामस्मरण, वराड दुपारी १२ वाजता महाआरती, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजने. रात्री ८ वाजता महाआरती, ९ वाजता महाप्रसाद अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.