अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांची आचरा रामेश्वर मंदिराला भेट…

⚡मालवण ता.१३-:
अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील नित्य दैनंदिन पुजा अर्चा वमठातील वार्षिक साजरे होणारे सण यांची माहिती सर्वांना समजावी.स्वामी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सदीच्छा भेट घ्यावी या उदात्त हेतूने सिंधुदुर्ग मध्ये आलेल्या
श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी आचरा येथील रामेश्वर मंदिरास भेट देवून रामेश्वर देवाचे दर्शन घेतले..यावेळी रामेश्वर देवस्थान समितीचे सचिव संतोष मिराशी , खजिनदार कपिल गुरव यांच्या तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच काकड आरती मंडळातर्फे ही त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी काकड आरती मंडळाचे मंदार सांबारी, अर्जुन बापर्डेकर, रविकांत भिसळे, दौलत राणे, श्रीमती वैशाली सांबारी, सुधीर मुणगेकर, प्रकाश पुजारे,बाळू कोदे, पंकज घारे, दिपक मेस्त्री, वैशाली मेस्त्री, श्रीमती मेस्त्री, शोभा पेडणेकर,यांसह अन्य तसेच देवस्थान समितीचे मंगेश मेस्त्री ,हडपीड देवस्थानचे नंदकुमार पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी वटवृक्ष देवस्थान तर्फे ही स्वामी भक्तांचा महेश इंगळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

फोटो–

रामेश्वर देवस्थान तर्फे महेश इंगळे याचा सन्मान करताना संतोष मिराशी, कपिल गुरव

छाया – संस्कार गाठे

You cannot copy content of this page