राज्य अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत लीना धुरी हिला सुवर्णपदक…

⚡मालवण ता.०८-:
पुणे येथे झालेल्या ७३ व्या खुल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत मालवण गवंडीवाडा येथील सुकन्या लीना धुरी हिने ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना १०० × ४ रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

लीना धुरी ही मातोश्री ताई पाटकर अकॅडमी, मालवणची खेळाडू असून सध्या ती ठाणे येथे सराव करून ठाणे जिल्ह्यातून खेळत आहे. लीना धुरीला निलेश पाटकर व ताराचंद पाटकर या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page