श्री अजयराज वराडकर:जिल्हा विभाग व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट वितरण सोहळा संपन्न..
⚡मालवण ता.१३-: कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ( सं)कट्टा, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल , च्या विद्यार्थ्यांचा तालुकास्तर, जिल्हास्तर ते राज्यस्तर अशा वैयक्तिक तसेच सांघिक क्रीडा स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत आहे या कामगिरीसाठी शाळेत सर्व शिक्षक मेहनत घेत आहे अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू घडवण्यासाठीचा हा प्रयत्न चांगला असून असा ध्येय बाळगून विद्यार्थ्यांनी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याचे स्वप्न पहावे असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री अजराज वराडकर यांनी तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट वितरण समारंभात केले.
यावेळी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण मंडळचे सचिव श्री सुनील नाईक सचिव श्रीमती विजयश्री देसाई खजिनदार रविंद्र पावसकर,स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर संचालिका स्वाती वराडकर संचालक महेश वाईरकर आरोग्य अधिकारी गोळवण श्री. डॉ. साळकर, मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे, प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, राकेश डगरे, गणेश वाईरकर उपस्थित होते
विद्यार्थ्यांनी विभाग, जिल्हा आणि राज्य पातळीवर मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची दखल संस्थेने घेत या सर्व यशस्वी ५० विद्यार्थ्यांना कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष योगात्मा डॉ. व्ही.के. तथा काकासाहेबांचा लोगो असलेला आकर्षक ट्रॅक सूट देऊन सन्मान केला. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक संजय पेंडूरकर किसन हडलगेकर, भूषण गावडे यांनाही संस्थेच्या वतीने ट्रॅक सूट देण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख श्री.संजय पेंडुरकर तर आभार प्रदर्शन गजेंद्र मिराशी (प्राचार्य) यांनी केले
