ठाकरे शिवसेना जि. प. सदस्य यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट…

⚡वेंगुर्ला ता.१३-: वेंगुर्ला व कुडाळ तालुक्यातील ठाकरे शिवसेनेतर्फे जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजयी झालेल्या विजय नाईक ( आडेली जि. प.) संजय गावडे ( उभादांडा जि. प.) व गंगाराम सडवेलकर ( पिंगुळी जि. प.) यांनी आज शुक्रवारी माजी मुख्यमंत्री व ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुंबई येथील मातोश्री बंगल्यावर भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच त्यांनी माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, माहीमचे आमदार महेश सावंत, वेंगुर्ला तालुकाप्रमुख निलेश चमणकर, शहरप्रमुख शैलेश परुळेकर, उभादांडा विभागप्रमुख सुजित चमणकर, अणसुर विभागप्रमुख आनंद गावडे, ओंकार नाईक, रामघाट येथील मकरंद परब आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तिन्ही जिल्हा परिषद सदस्यांचे विशेष अभिनंदन करून यापुढेही लढत राहून संघटना वाढविण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी निलेश चमणकर यांचे विशेष अभिनंदन केले. पुढील महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वेंगुर्ला येथे भव्य सत्कार कार्यक्रम संपन्न होणार आहे.

You cannot copy content of this page