सहभागी होण्याचे तहसीलदार यांचे आवाहन..
⚡कुडाळ ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा एकदा जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या १३ जून २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार ही नवीन आरक्षण सोडत आता १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सिद्धिविनायक हॉल रेल्वे स्टेशन रोड, कुडाळ येथे काढण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य लोकप्रतिनिधी आणि नागरीक यांनी या सोडत कार्यक्रमास उपस्थितीत राहावे असे आवाहन कुडाळते तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले आहे.
ग्रामविकास विभागाने 13 जून रोजी प्रसिद्धीस केलेल्या नवीन अधिसूचनेमुळे मागील सर्व अधिसूचना रद्दबातल ठरवण्यात आले आहेत. कुडाळ तालूक्यातील ग्रामपंचायतीच्या प्रवर्ग निहाय सरपंचांची पदे ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-व दिनांक १३ जून २०२५ अन्वये सन 2025 ते 2030 या कालावधीत होणा-या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका विचारात घेऊन आरक्षण निश्चित केली असून त्यांचे तालुकानिहाय वाटप निश्चित करणेत आले आहे. कुडाळ तालूक्यातील सरपंचपदे जिल्हाधिकारी सिधुदुर्ग यांजकडील दि.७ जुलै २०२५ च्या पत्रान्वये आरक्षित करुन देणेत आलेली आहे.
ती आरक्षणे खालीलप्रमाणे आहेत , अनुसूचित जातीसाठीआरक्षित सरपंचाची पदे – प्रवर्ग – २ / महिला – ३, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचाची पदे – प्रवर्ग – १ / महिला – ०, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचाची पदे – प्रवर्ग – ९ / महिला – ९, खुला प्रवर्ग – प्रवर्ग – २२ / महिला – २२
ही नवीन आरक्षण सोडत आता १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सिद्धिविनायक हॉल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे काढण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य लोकप्रतिनिधी आणि नागरीक यांनी या सोडत कार्यक्रमास उपस्थितीत राहावे असे आवाहन कुडाळते तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले आहे.