वायंगणवाडी येथे मुख्य वीज वाहिनी कोसळल्याने शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू…

⚡बांदा ता.०८-: असनीये वायंगणवाडी येथे मुख्य वीज वाहिनी कोसळल्याने शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात शेतकऱ्यासह इतर जनावरे बालंबाल बचावली. असनीये सरपंच रेश्मा सावंत, पोलीस पाटील विनायक कोळकटे यांच्यासह ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेतली असून महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, या मुख्य वीज वाहिनीचे काम चार दिवसांपूर्वी करण्यात आले होते. आज सायंकाळी हीच मुख्य वीज वाहिनी वायंगणवाडी येथे कोसळली. यामध्ये शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला असून शेतकरी लक्ष्मण वासुदेव सावंत यांच्यासह इतर जनावरे प्रसंगवधान राखल्याने बचावली. महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री ठाकूर हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना ग्रामस्थांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले.

You cannot copy content of this page