Headlines

विशाल परब यांच्या गणेश चतुर्थी विशेष कॅलेंडरचे निलेश राणेंच्या हस्ते प्रकाशन…

*⚡कुडाळ ता.१३-:* भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते राणे यांचे कट्टर समर्थक विशाल परब यांच्या गणेश चतुर्थी विशेष कॅलेंडरचे प्रकाशन सिंधुदुर्ग राजाच्या मंडपात करण्यात आले आहे. निलेश राणे हे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यानी काल कुडाळ येते सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी या कॅलेंडरच्या प्रकाशन केले

Read More

निलेश राणेंनी घेतले संजू परब यांच्या मडुऱ्यातील गणरायाचे दर्शन

*सावंतवाडी ता.१२-:* सावंतवाडीचे नगराध्यक्ष तथा मडुरा गावचे सुपुत्र संजू परब निवासस्थानी माजी खासदार निलेश राणे यांनी मडुरा भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, युवा नेते विशाल परब, आनंद शिरवळकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

Read More

तरुणांना रोजगाराच्या दृष्टीने विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार – खा. सुरेश प्रभू

मालवण दि प्रतिनिधी मानव संसाधन विकास संस्थेला २५ वर्षे पूर्ण होत असून या संस्थेचे देशातील पहिले जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थापन झाल्यावर २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काही नवीन उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग बरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यातून जनशिक्षण संस्थान स्थापन करण्यात आले असून या संस्थानची दोन्ही जिल्ह्यात…

Read More

सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा

मालवण ग्रामीण रुग्णालयात दोन एअर बेड आणि दोन नेब्यूलायझर दिले भेट मालवण (प्रतिनिधी) मालवण मधील युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत मालवण ग्रामीण रुग्णालयाला दोन एअर बेड, दोन नेब्युलायझर भेट दिले. तसेच रुग्णांसाठी फळांचे वाटपही केले. मालवणच्या सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेऊन कार्यरत असणाऱ्या अमेय देसाई यांनी कोरोना…

Read More

मुंबई विद्यापीठाचा सिंधुदुर्ग उप परिसर हा आदर्श व्हावा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी *⚡सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* सुंदर व निसर्गसंपन्न जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झालेला मुंबई विद्यापीठाचा सिंधुदुर्ग उप परिसर हा आदर्श असा व्हावा असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसराचे आज राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सावंतवाडी येथे ऑनलाईन उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ….

Read More

तळाशीलच्या प्रश्नांबाबत मेघनाद धुरी यांनी वेधले महसूल, बांधकाममंत्र्यांचे लक्ष

*⚡मालवण ता.१२-:* काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी तळाशील धूप प्रतिबंधक बंधाराप्रश्नी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे, तर खाडीतील वाळू उत्खनाबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे लक्ष वेधले. काँग्रेसच्या दोन्ही मंत्र्यांमार्फत हे दोन्ही विषय मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही धुरी यांनी तळाशील ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जयहरी कोचरेकर यांना दिली आहे. बंधारा…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४ रुग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१२-:* सावंतवाडी तालुक्यात आज ४ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात १ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read More

जिल्ह्यात आज आणखी २३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८हजार ५२४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ३२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन

*⚡वेंगुर्ला ता.१२-:* वेंगुर्ला तालुक्यासह शहरातील दीड दिवसांच्या गणपतींचे शनिवारी विसर्जन करण्यात आले. शुक्रवारी घरोघरी गणपतींचे पूजन करण्यात आले होते. दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन शनिवारी करण्यात आले. शहरातील साकव, पत्र्याचे पूल, आडी स्टॉप, चाफाळगा, मांडवी यांसह तालुक्यातील ठिकठिकाणच्या समुद्रकिनारी फटाकांच्या आतषबाजीत आणि ढोलताशांच्या गजरात, भजनासह गणपतींचे विसर्जन रात्रौ उशिरापर्यंत सुरु होते.

Read More

परतीच्या प्रवासासाठी वेंगुर्ला आगारातून बसेस सुरु

*⚡वेंगुर्ला ता.१२-:* गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी वेंगुर्ला आगारातून दि.१५,१६ व १७ रोजी दुपारी ४ वाजता वेंगुर्ला-अर्नाळा व ४.३० वाजता वेंगुर्ला-बोरिवली बस उपलब्ध करण्यात आली आहे. या दोन्ही बसचे ऑनलाईन बुकिंग सुरु करण्यात आले असून काही बसेस या बुक झाल्या आहेत. तसेच ग्रुप बुकिंगचीही सोय करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार बस उपलब्ध होतील. तसेच सायंकाळी ४.१५ वा….

Read More
You cannot copy content of this page